Sunday, February 5, 2023

आरएसएसच्या छुप्या पाठिंब्याने भाजपचा आरक्षण मुक्त भारतचा नारा : भानुदास माळी

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आज केंद्र शासनाने कोर्टाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्णपणे घालवलेले आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत आरएसएस असून भाजपला आरएसएसचा पूर्ण छुपा पाठिंबा आहे. भाजपचा आरक्षण मुक्त भारत करण्याचा डाव असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केली.

- Advertisement -

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भानुदास माळी म्हणाले, केंद्राने लोकसभेत स्पष्टपणे सांगितले आहे, आम्ही कोणताही डेटा आणि जनगणना करणार नाही. इतका उन्मत्तपणा, मूर्खपणा या देशातील कोणत्याही सरकारने केलेला नव्हता.
या सर्व गोष्टींना कारणीभूत आरएसएस असून भाजपला आरएसएसचा पूर्ण छुपा पाठिंबा आहे.

भाजपचा आरक्षण मुक्त करण्याचा डाव आहे, त्यामुळे 15 नोव्हेंबरला एक लाख लोक दिल्लीच्या जंतर-मंतरवर जाणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात जनजागृतीचे काम चालू आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर जेलभरो आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. जोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील ओबीसींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आरक्षण मुक्त भारत हा त्यांचा नारा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी बचाव आंदोलन सर्व जिल्ह्यांमध्ये राबविले जाणार असून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.