औरंगाबाद – माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडवणीस यांना चौकशीची नोटीस दिल्या विरोधात आज औरंगाबादेतिल क्रांतिचौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठा गौप्यस्फोट करीत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. फडवणीसांच्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना नोटीस आली होती. त्याचा राज्यभर निषेध म्हणून भाजपच्या वतीने आंदोलन सुरू आहेत.
दरम्यान आज सकाळी शहर जिल्हा भाजपच्या वतीने क्रांतिचौक येथे आंदोलन करण्यात आली.यावेळी आंदोलकांनी राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.संतप्त कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा देखील प्रयत्न केला असता पोलिसांनी सुमारे सव्वाशे आंदोकलना ताब्यात घेतले दुपार पर्यंत कार्यकर्ते क्रांतिचौक पोलिसांच्या ताब्यात होते.