“नरेंद्र मोदींचा मुकाबला राहुल गांधीच करु शकतात !”; काँग्रेस नेत्याचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाच राज्यात दारुण पराभव झाल्याने काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या ऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद दिले जावे, अशी चर्चा सुरु असताना काँग्रेसचे नेते अशोक गेहलो यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. यावेळी नरेंद्र मोदी याचा मुकाबला राहुलच करू शकतात. त्यामुळे त्यांनाच अध्यक्ष करावे, असे म्हंटले.

आज दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या महत्वाच्या सर्व नेत्याची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीस राहुल गांधी, प्रयक गांधी यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते अशोक गेहलो म्हणाले की, काँग्रेस पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी अध्यक्षपदी काँग्रेच्या अध्यक्षपदी गांधी परिवारातीलच व्यक्ती असणे गरजेचे आहे. पंजाब सोडले तर इतर चार राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे.

यूपीसह, मणिपूर, गोवा या राज्यात भाजपनं मुसंडी मारली होती. मात्र भाजपच्या या विजयामागे मतांचे ध्रूवीकरण झाले आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच गांधीच्या विचारांवर चालत आला आहे. राज, धर्म यावर काँग्रेसनं निवडणुका लढलेल्या नाहीत, असेही यावेळी गेहलोत यांनी म्हंटले.

Leave a Comment