भाजपाचे काम फत्ते.. शिंदेंच्या राजकीय अस्ताची ही सुरूवात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. तसेच आता भाजपचे काम फत्ते झालं असून शिंदेंच्या राजकीय अस्ताची हि सुरुवात आहे का? असं म्हणत एकनाथ शिंदेंना इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, शिंदेंचा खांदा वापरून भाजपाने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा फडशा पाडण्याचे काम चालवले आहे. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आहे. भाजपाचे काम फत्ते झाले आहे. आता हस्तक शिंदेंचा भाजपाला काय उपयोग? एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्ताची ही सुरूवात आहे?

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे या दोघांनाही सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे. दोन्ही गटांना 3 चिन्हांची निवड करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.