औरंगाबाद – खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा पुन्हा छेडला आहे. अलिकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेची मर्यादा 2 वर्षांसाठी वाढवावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. जिल्हा प्रशासनाने घरकुल बांधण्यासाठी विवादग्रस्त जागा दिली त्याठिकाणी डोंगर, उच्च विद्युत वाहिन्या, खदानी व अतिक्रमण असून प्रशासनाने गोरगरीब जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यानी केला. तसेच शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे गॅस पाईप लाईनची नाही.
आता 2 मार्च रोजी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पूरी औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते शहरात टाकण्यात येणाऱ्या गॅस पाईप लाईनचे उद्घाटन करणार आहे.
परंतु खासदार जलील यांनी काल घेतलेल्या आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा पक्ष घरकुल योजना संदर्भात हरदीप सिंह पुरी यांचा काळे झंडे दाखवून विरोध करणार आहे.