व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपा युवा मोर्चाचा रास्ता रोको

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्य सरकारमधील नेत्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी बांधवांना आरक्षण मिळू शकत नाही. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील ओबीसीचे आरक्षण या महाविकास आघाडीने घालविले. अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या निधीअभावी हे आरक्षण गेले असल्याची टीका ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश कुंडलिक टिळेकर यांनी केले.

सातारा येथे बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत टीकास्त्र सोडले. सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी विनंती करीत काही काळात आंदोलन संपुष्टात आणले. आंदोलन कर्त्यांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. या वेळी येथे वाहतूक झालेली होती.

आ. योगेश टिळेकर म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाला फसविले. गेल्या अडीच वर्षात केवळ मागासवर्गीय आयोग स्थापन केला, परंतु त्याला अजित पवार यांच्या अर्थ खात्याने निधी दिला नाही. कोर्टात ओबीसीचे आरक्षण टिकवू शकले नाहीत. त्यामुळे ओबीसी आरक्षण घालविण्यास केवळ महाविकास आघाडी जबाबदार आहे.