मलिकांसाठी अट्टहास केला तेवढा ओबीसीसाठी करायला हवा होता, मात्र… ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतरही त्यांना मंत्रीपदी ठेवण्यात आले आहे. यावरून महा विकास अगदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारवर टीका केली. मलिक यांना मंत्रिमंडळावर ठेवण्यासाठी जेवढा अट्टहास केला तेवढा ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी करायला हवा होता. मात्र तसे केले नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज महाविकास आघाडीचे सरकार ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतीही धडपड करत नाही. मात्र, जेलमध्ये असलेल्या मंत्र्यांसाठी धडपड करत आहे. याउलट आरोप पत्रातून मलिक यांच्या विरोधात अंक खळबळजनक पुरावे समोर येत आहेत. आणि त्यावरून मलिक याचा संबंध दि गँगशी असल्याचे स्पष्ट जाणवतही आहे. आणि मुख्यमंत्री मात्र अशा मंत्र्यासोबत काम करत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मलिक यांना पाठींबा देणाऱ्या ठाकरे सरकारकडून ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मी दोन वर्षांपासून सांगत आहे ओबीसींना आरक्षण द्या. इम्पेरिकल डेटा तयार करा आणि तो न्यायालयात सादर करा, मात्र, सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दोन वर्षात मात्र, या ठाकरे सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता, ओबीसी आरक्षणाकरता कुठलीही धडपड केली नाही. मात्र त्याचवेळी डी गॅंगशी संबधित जेलमध्ये असलेले नवाब मलिक मंत्रीमंडळात राहायला हवेत यासाठी सरकारने धडपड केली. याच्यापेक्षा अर्धी धडपड इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.