सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीसह पाच गावातील ग्रामस्थांनी आज पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सातारा-पंढरपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीश पाच गावातील ग्रामस्थांकडून गेल्या नाईक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या वर्धनगड बोगद्याच्या सुरुवातीस दाबहरण कुंडास असणाऱ्या वॉल्वमधून पाणी दिल्यास ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला.
सातारा – पंढरपूर महामार्गावर पिण्याच्या पाण्यासाठी पाच गावातील ग्रामस्थांचा रास्ता रोको pic.twitter.com/X6xPgQh9gg
— santosh gurav (@santosh29590931) March 24, 2023
यावेळी रामोशीवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांसमोरच जोरदार घोषणाबाजी केली.