Blue Java Banana : लाल, पिवळं सोडा निळं केळ खाल्लंय का? आरोग्यदायी फायदे जाणून वाटेल आश्चर्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Blue Java Banana) दैनंदिन स्वरूपात आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ञ सांगतात. त्यामुळे आहारात केवळ भाजी, चपाती, डाळ, भात असून चालत नाही. तर आपल्या आहारात फळांचा समावेश देखील असावा लागतो. यातही दररोज केळी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बरेच लोक दररोज केळी खातात. आजपर्यंत तुम्ही कच्ची हिरवी केळी, पिवळी केळी किंवा अगदी लाल केळीसुद्धा खाल्ली असतील. पण कधी निळी केळी खाल्ली आहेत का? होय तुम्ही बरोबर वाचताय. निळी केळी. जर तुम्हाला या केल्याविषयी माहित नसेल तर ही बातमी पूर्ण वाचा. याध्ये आपण निळ्या केल्याचे सेवन केल्याने कोणते फायदे मिळतात? याविषयी जाणून घेणार आहोत.

निळ्या रंगाची केळी (Blue Java Banana)

वास्तविक, निळ्या रंगाची केळी ही केळीची एक अशी जात आहे जिला Java Banana किंवा Blue Java Banana या नावाने ओळखले जाते. ही केली अत्यंत मलईदार आणि मऊ असतात. या केळ्यांची साल आणि त्यांचा गर दोन्ही निळ्या रंगाचा असतो. ही केळी बहुतेक कमी तापमान असलेल्या ठिकाणी आढळतात. खास करून थंड प्रदेशात या केळ्यांची लागवड केली जाते. त्याची चव आईस्क्रीमसारखी असते. शिवाय ही केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. त्याविषयी जाणून घेऊ.

पोषक तत्वांनी समृद्ध

निळ्या रंगाची केळी ही अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. जीवनसत्त्वे, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 ने परिपूर्ण असणारी ही केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. (Blue Java Banana)

पचनक्रियेशी संबंधित समस्या होतील दूर

निळ्या केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे निळी केळी खाल्ल्याने पचनक्रियेशी संबंधित कोणत्याही समस्या दूर होतात. शिवाय पोटाशी संबंधित सर्व समस्यांपासून आराम देण्यासाठी निळी केली फायदेशीर आहेत.

रक्तदाबावर नियंत्रण

जी व्यक्ती अनियंत्रित रक्तदाबाच्या समस्येने पीडित असेल त्या व्यक्तीने निळ्या केळ्याचे सेवन करावे. (Blue Java Banana) याच्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते जे रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

गंभीर आजारांचा धोका कमी होतो

निळी केळी अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असतात. त्यामुळे या केळ्याचे सेवन केल्यास गंभीर आणि मोठ्या आजारांचा धोका कमी होतो. जसे की, कॅन्सर.