BMC Election 2026 : BMC साठी भाजपकडून 20 धुरंधर नेत्यांची नावे जाहीर; पहा कोणाकोणाचा समावेश

BMC Election 2026 BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचे कमळ मुंबई महापालिकेवर फडकवायचेच आणि आपला स्वतःचा महापौर बसवायचाच यासाठी भाजपने जंग जंग पछाडलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपकडून निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी 20 जणांच्या नावे जाहीर करण्यात आली आहे. या नेत्यांवर मुंबई महापालिका निवडणुकीची मुख्य जबाबदारी असेल.

कोणकोणत्या नेत्यांचा समावेश BMC Election 2026

1) अमित साटम,
2) आशिष शेलार
3) पियुष गोयल
4) विनोद तावडे
5) राहुल नार्वेकर,
6) मंगलप्रभात लोढा,
7) प्रवीण दरेकर,
8) अतुल भातखळकर,
9) भाई गिरकर,
10) योगेश सागर,
11) पराग अळवणी,
12) मिहीर कोटेचा,
13) प्रसाद लाड,
14) मनिषा चौधरी,
15) चित्रा वाघ,
16) राजेश शिरवडकर,
17) गणेश खणकर, महामंत्री, मुंबई भाजप
18) आचार्य पवन त्रिपाठी
19) श्वेता परुळकर,
20) प्रभाकर शिंदे,

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2026) भाजप आणि शिंदे गटाचे अजित पवार गटाला युतीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नवाब मलिक यांच्या खांद्यावर अजित पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला. अजित पवार सोबत नसल्याने एकूण २२७ प्रभाग असलेल्या मुंबईत भाजप आणि शिंदे गटात जागावाटपासाठी चढाओढ पाहायला मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार. भाजप आणि शिंदे गटात १५० जागांवर एकमत झालेले आहे. उरलेल्या ७७ जागांवर अजूनही तिढा कायम आहे. उर्वरित 77 जागांपैकी कोण किती जागा लढवणार याचा फैसला लवकरच होणार असल्याची माहिती शिवसेना आणि भाजप नेत्यांनी दिली आहे. शिंदे गटाकडून ८४ पेक्षा जास्त जागांची मागणी केली जात आहे, मात्र भाजप इतक्या जाग देणार नसल्याचं बोललं जातेय. त्यामुळे महायुतीत आणखी काय काय घडामोडी घडतात ते पाहायला हवं.