नळदुर्ग किल्यातील दुर्घटनेप्रकरणी बोटचालकाविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी

नळदुर्ग येथील भुईकोट किल्यातील बोरी नदी पात्रामध्ये बोटींगचा आनंद घेत असताना शनिवार रोजी तिघा मुलांचा बोट उलटून मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोटचालकाविरुध्द नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोटचालक शाम वसंत गायकवाड रा. नळदुर्ग असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अलमास शफिक जागिरदार रा. मुंबई, सानिया फारुख काझी, इजहान अहसान उल्ला काझी दोघे रा. काझी गल्ली नळदुर्ग व इतर सहा मुले असे सर्व किल्ला पाहण्यासाठी त्यांचा मामा अहसान नय्यर काझी रा.नळदुर्ग यांच्यासोबत शनिवार रोजी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गेले असता ते नळदुर्ग किल्यातील बोरी नदीत बोटींगचा आनंद घेत असताना बोट उलटून तिघा मुलांचा मृत्यु झाला.

बोट चालक शाम वसंत गायकवाड याने सदरची बोट हयगयीने व निष्काळजीपणे चालवून बोट पाण्यात पलटी करुन वरील तिघा मुलांच्या मरणास कारणीभुत झाल्याची फिर्याद महमद शफिक अब्दुल जागीरदार रा.मुंबई यांनी दिल्यावरुन शाम वसंत गायकवाड याचेविरुध्द पोलीसात भादंविचे कलम 304(अ),280 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment