सैन्यात भरती व्हायचे स्वप्न राहिले अधुरे ! व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

Suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या एका तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे. औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ओमकार नारायण डांगरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी हा तरुण घरी न सांगता सकाळपासून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे या तरुणाच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा घरी न आल्याची तक्रार दाखल केली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत ओमकारचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. त्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत आढळले.

यानंतर पोलिसांनी या मोबाईल लोकेशनच्या आधारे औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक 18 मध्ये धाव घेतली. त्यावेळी एका विहिरीजवळ ओमकार याची गाडी आणि चप्पल दिसून आली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर ओमकारचा मृतदेह (Suicide) विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. ओमकार डांगरे याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर “I just feel like if I died everything will be ok:” अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला. मात्र ओमकारने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!