हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी फार कमी लोक अत्यंत जवळची होती. मात्र त्याही साऱ्या लोकांमध्ये त्यांच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे त्यांची आई. बोमन यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईनेच त्यांच्या आयुष्यात वडिलांची कमी भरून काढली होती. त्यांनी एकटीने त्यांचे घर मोठ्या हिंमतीने चालवले. आपल्या मुलाचे अर्थात बोमन यांचे पूर्ण शिक्षण त्यांनी एकटीने पूर्णत्वास नेले. लहानपणापासून ते आतापर्यंत बोमन याना त्यांच्या आईचा नेहमीच एक आधार होता. होता म्हणण्याचे कारण असे कि हा आधार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. बोमन त्यांच्या आईचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने बोमन यांचे आयुष्य संपूर्णपणे कोलमडले आहे.
https://www.instagram.com/p/CP5iu9TH4Rw/?utm_source=ig_web_copy_link
आईच्या निधनानंतर एक मोठा खंबीर आधार गेल्याने बोमन अतिशय हतबल झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, माझ्या आई आज वारली. वयाच्या ९४व्या वर्षी आज सकाळी झोपेतच तिचे निधन झाले. ती ३२ वर्षांची असल्यापासून माझ्या आयुष्यात आई आणि त्याचसोबत वडील या दोन्ही भूमिका साकारत होती. तू अभिनेता आहेस म्हणून लोकांनी तुझे कौतुक नाही केले पाहिजे, तर तू त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतोस यासाठी सगळ्यांनी तुझे कौतुक केले पाहिजे असे ती मला नेहमी सांगायची.
https://www.instagram.com/p/CHvQqDhnRLk/?utm_source=ig_web_copy_link
पुढे म्हणाले, लोकांना नेहमी आनंदच देत जा… असे ती मला नेहमीच सांगायची. तिने काल रात्री आमच्याकडे आंबा आणि मलाई कुल्फी मागितली होती. ती आमच्याकडे चंद्र किंवा मग तारेसुद्धा मागू शकली असती… पण ती स्वतःच नेहमी एक तारा होती आणि असणार आहे. अभिनेता बोमन इराणी यांच्या आईच्या निधनाचे वृत्त पाहून अंकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तर बॉलिवूड तसेच मराठी जगतातील अनेक कलाकारांनी देखील बोमन यांच्या पोस्टवर त्यांच्या आईंना श्रद्धांजली वाहिली आहे व त्या नेहमी आपल्या आठवणीत जिवंत राहतील असे म्हटले आहे.