Mother’s Day Special- बॅडमिंटन आणि आईसाहेब; रितेश देशमुखने शेअर केला खास क्षणांचा व्हिडीओ

Riteish Deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मे महिन्यातील दुसरा रविवार म्हणजेच जागतिक मातृदिन आहे. खरतर आईपणाची भावना हि जगातील कोणत्याही गोष्टींहून अधिक वंदनीय आहे. मात्र आईप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी जर आजचा एखादा खास दिवस मिळत असेल तर काय वाईट आहे. आयुष्यभर जिच्या ऋणातून सुटका नाही अश्या आईचा हा दिवस आहे. आज अनेक कलाकारांनी अनोख्या पद्धतीने आपापल्या आईंसह जगातील इतर सर्व मातांना व मातृत्वाच्या या भावनेला, जाणिवेला वंदन केले आहे. तर अभिनेता रितेश देशमुखने आपल्या आईसोबत घालवलेल्या काही खास क्षणांचा एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने आई, लव्ह यु.. हैप्पी मदर्स डे असे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/p/COphpi9DhOA/?utm_source=ig_web_copy_link

 

या व्हिडिओने तासाभरातच इंस्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत. तर फेसबुकवर  ४० हजाराहून अधिक लाईक्स आणि ५०० हुन अधिक कमेंट्सचा पल्ला पार केला आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओत तो आईसोबत बॅडमिंटन खेळताना दिसतोय. इतकेच नव्हे तर पुढे त्याच्या लहानपणीचा एक सुंदर फोटो देखील आपण या व्हिडिओत पाहू शकतो. सोबतच रितेशच्या आई म्हणजेच स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या पत्नी आपल्या लेकाच्या खांद्यावर डोकं ठेऊन आनंदी असलेला एक सुंदर क्षण देखील आपण पाहू शकता. हा व्हिडीओ सुरु असताना त्याच्या मागे चिंटू या मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाणे एकटी एकटी घाबरलीस ना मधील एक सुंदर कडवे चालू आहे. ह्या गाण्यातील बरं झालं आलास सोन्या हे मनाला भिडणारे कडवे आणि व्हिडिओतील आई-मुलाचे सुंदर क्षण अगदी एकमेकांना साजेसे आहे.

https://www.instagram.com/p/COozR19sFBg/?utm_source=ig_web_copy_link

आज जागतिक मातृदिनाचे निमित्त साधून रितेशची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसोजा-देशमुखने देखील एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये जेनेलियाने दोन फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. यातील एका फोटोत जेनेलिया आपल्या दोन्ही मुलांसह तिच्या आईसोबत दिसतेय. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोन्ही लहान मुले व तिच्या सासूबाई म्हणजेच रितेशची आई दिसत आहे. ह्या फोटोंसहित तिने एक सुंदर मात्र मनाला भिडणारे असे कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनद्वारे व्यक्त होताना जेनेलियाने म्हटले आहे कि, तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते. तसेच या दोघांव्यतिरिक्त अनेक कलाकारांनी आजच्या खास दिनानिमित्त सोशल मीडियाद्वारे आपल्या आईसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.