बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला मिळाला यूएईचा गोल्डन व्हिसा; ट्विटरवर दिली माहिती

Sanjay Datt
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त हे दोघे सध्या दुबईत आहेत. मान्यता दत्तसह संजय दत्त अगदी आनंदात संसार करत आहेत. संजय दत्तने यंदा रमजान ईदचा सण दुबईमध्ये साजरा केला आहे. पत्नी मान्यता दत्तने सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटोदेखील शेअर केले आहेत. संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. पुढे योग्य उपचार घेतल्यानंतर त्याने कर्करोगावर मात केली आणि पुन्हा एकदा जोमाने त्याच्या कामाला सुरुवात केली होती. त्याच्या उपचारादरम्यान त्याचे संपूर्ण कुटुंब दुबईत राहत असे. त्यानंतर आता संजय दत्त ला यूएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. हि बातमी संजय दत्तने स्वतःहून ट्विटरवर दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त कर्करोगावरील उपचारादरम्यान सातत्याने दुबईत ये जा करीत असे. या दरम्यान त्याचे कुटुंबदेखील बहुतेक वेळा दुबईमध्ये राहत असे. त्यामुळे उपचारादरम्यानही अधून मधून मान्यता आणि मुलांना भेटण्यासाठी तो दुबईत वारंवार जात असायचा. गेल्या काही महिन्यांपासून संजय दत्त त्याच्या कुटूंबासह दुबईमध्येच राहत आहे. नुकतेच संजय दत्तला युएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. खुद्द संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

https://www.instagram.com/p/CL335B3HvKC/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता संजय याने ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत युएई सरकारचे आभार मानले आहेत. हा व्हिसा मिळवणारा संजय दत्त हा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पहिला अभिनेता आहे. सोशल मीडियावर संजय दत्तने हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. शेअर करताना संजय दत्तने काही फोटोदेखील शेअर केले आहेत. फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘@GDRFADUBAI चे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा मिळणं हा माझा मोठा सन्मान आहे. याचसोबत ‘फ्लाई दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत. या गोल्डन व्हिसाचे विशेष म्हणजे हा व्हिसा मिळवणाऱ्या परदेशी नागरिकांना युएईच्या नागरिकांप्रमाणे अधिकार दिले जातात. युएईचा गोल्डन व्हिसा हा १० वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी दिला जातो.