सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताचं अंकिता लोखंडे म्हणाली ..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनंही लगेचच याबाबतचं आपलं मत मांडलं. नेहमी सत्याचाच विजय होतो, या आशयाचं ट्विट करत अंकितानं न्यायदेवतेचा फोटो पोस्ट केला. अंकिता व्यतिरिक्त सुशांतच्या कुटुंबीयांसह इतरही सेलिब्रिटींनी या निर्णयाचं स्वागत करत आता सुशांतला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. शिवाय बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या सर्व प्रकरणात मुबंई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं, तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment