मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट ब्रह्मास्त्र चित्रपटातील तिचा सहकलाकार रणबीर कपूरला डेट करत असल्याचं समजत आहे. रणवीर सोबतच्या नात्यावर बोलताना मला शाय फील होतय असं अलीयाना म्हटल आहे. निकेलोदेओन किड्स चोइस अवार्ड्स कार्यक्रमाच्या दरम्यान पत्रकारांशी आलियाने बातचीत केली.
रणबीर सोबतच्या नात्याला वडील महेश भट यांची काय प्रतिक्रिया आहे असा प्रश्न विचारला असता आलियाने “Why You are Going into Future?” असं उत्तर दिल. मला वर्तमानात राहायला आवडतं असं म्हणून तिने याविषयावर अधिक बोलणं टाळले.
काही दिवसांपूर्वी आलियाचे वडील आणि प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनीसुद्धा आलीय रिलेशनशिप मध्ये असण्याला पुष्टी दिली होती. माझी मुलगी रणबीर ला डेट करत असल्याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हणल होत.