मुंबई । भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. भारतीय हद्दीतील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेख या प्रदेशावर नेपाळने आपला दावा केला आहे. मागील काही दिवसापासून नेपाळ या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहे. हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताला दिला. या सर्व वादावरून तणाव वाढून भारत नेपाळ आमनेसामने आले आहेत. अशावेळी या वादात अभिनेत्री मनिषा कोईराला हिनं उडी घेतली आहे. या दोन देशांच्या वादात तिनं नेपाळच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
मनिषा काईराला हिनं नेपाळ सरकारला धन्यवाद दिले. तसंच भारत, नेपाळ आणि चीन या तिन्ही महान देशांमध्ये मी शांतीपूर्ण आणि सन्मानजनक चर्चेची अपेक्षा करत असल्याचंही तिनं म्हटलं. तिनं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. सविस्तर माहितीनुसार नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. यात मंत्रिमंडळानं नवा नकाशा जारी करण्यास मान्यता दिल्याचं म्हटलं होत.
यामध्ये ७ प्रांत. ७७ जिल्हे आणि लिपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह ७५३ स्थानिक प्रशासनिक मंडळंही दाखवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अधिकृत नकाशा लवकरच मिनिस्ट्री ऑफ लँड मॅनेजमेंटद्वारे जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होती. प्रदीप ग्यावली यांच्या याच ट्विटवर रिप्लाय करत मनिषा कोईरालानं आपलं मत मांडलं आहे. मनीषा कोईराला मूळची नेपाळची असून बॉलीवूड सिनेमामांमध्ये काम करून तिनं लोकप्रियता मिळवली. मनीषा नेपाळच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या कोईराला कुटूंबातून येते. मनीषाचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला नेपाळचे माजी पंतप्रधान आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”