विशेष प्रतिनिधी । रामजन्मभूमी जमीन विवाद प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आज निकाल दिला. या निकालाचे स्वागत करत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपले मत व्यक्त करत या सेलिब्रिटींनी सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या सेलिब्रिटींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. तसंच शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निःष्पक्ष निर्णयाचं स्वागत करतो. अखेर बहुप्रतीक्षीत मुद्द्यावर आता समाधानकारक तोडगा निघेल,’ असं ट्विट भंडारकर यांनी केलं आहे.
Welcome the fair verdict over the #AyodhyaCase by Hon. Supreme Court. Finally the long pending issue will be resolved now. ????
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) November 9, 2019
अभिनेत्री कोएना मित्रानंही ट्विट केलं आहे. ‘काय निकाल आहे. धन्यवाद नरेंद्र मोदीजी,’ असं तिनं म्हटलं आहे. कुणाल कपूरनंही ट्विटद्वारे या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ही वेळ शांतता राखण्याचं आहे. आपण सर्व एकमेकांप्रती संवेदनशील राहूया आणि एक भारताचं निर्माण करावं, असं तो म्हणाला.
What a verdict! #RamMandir
Thank you Shri @narendramodi ji. #AYODHYAVERDICT pic.twitter.com/46ZXt2TSPt— Koena Mitra (@koenamitra) November 9, 2019
अभिनेत्री हुमा कुरेशी हिनंही ट्विट केले आहे. ‘माझ्या प्रिय भारतीयांनो, आज अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचा सन्मान करा. आपण सर्वांनी एकत्रित मिळून एका राष्ट्राच्या रुपानं पुढे जाण्याची गरज आहे, ‘ असं ती म्हणाली. ‘माझं सर्वांना आवाहन आहे की, आज अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करा. या निर्णयाचा अभिमानानं स्वीकार करा. तो तुमच्या बाजूने असो वा नसो. एकत्रित येऊन पुढे जाण्याची देशाला गरज आहे,’ असं फरहान अख्तर यानं म्हटलं आहे.
My dear Indians, please respect the Supreme Court verdict on #AyodhyaCase today. We all need to heal together and move on from this as one nation !! ????????
— Huma Qureshi (@humasqureshi) November 9, 2019