अभिनेत्री पूजा हेगडेचा असाही एक चाहता; केवळ चॉकलेट देण्यासाठी ५ दिवस काढले रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । बॉलीवूड स्टार्सना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या धडपडीचे अनेक प्रसंग बॉलीवूड स्टार्स नेहमी शेयर करतात. असाच एक किस्सा अभिनेत्री पूजा हेगडेने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. यावेळी अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर निख्खळ प्रेम करणारा चाहता तिच्यासाठी काय करू शकतो याचा अनुभव सांगणारा एक विडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओत पूजासोबत चॉकलेटचं पाकीट हातात घेतलेला तरुण दिसत आहे. भास्कर राव असं या तरुणाचं नाव असून तो केवळ पूजाला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र, ऐनवेळी पूजा मुंबईत नसल्याचे त्याला कळले.

दरम्यान, पूजाला भेटल्याशिवाय जाणार नाही असा निश्चयच त्याने केला होता. यासाठी तो सलग पाच दिवस मुंबईच्या थंडीत रस्त्यावर झोपला. चाहत्याचं आपल्यासाठीचं हे प्रेम पाहून पूजा भावूक झाली. पण तिला भेटण्यासाठी चाहत्याला पाच दिवस रस्त्यावर झोपावं लागलं हे पाहून तिला फार वाईट वाटलं. पूजाला जेव्हा या चाहत्याबद्दल कळलं ती लगेच त्याला भेटायला गेली. भास्करला भेटतानाचा एक व्हिडिओ पूजाने शेअर केला.

हा व्हिडीओसोबत लिहलेल्या पोस्टमध्ये पूजा सांगते कि,” ‘भास्कर राव मुंबईत येण्यासाठी आणि माझी पाच दिवस वाट पाहण्यासाठी धन्यवाद!मला या गोष्टीने आनंदच झाला पण एका गोष्टीचं दुःखही आहे की, मला भेटण्यासाठी माझ्या चाहत्यांना एवढा त्रास सहन करावा लागला. माझ्यासाठी माझ्या चाहत्यांनी रस्त्यावर झोपावं असं मला कधीच वाटणार नाही. तुम्ही सर्व माझी ताकद आहात. माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.”

 

पूजाच्या इंस्टापोस्टला तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद देत. तुला भेटण्यासाठी आम्ही सुद्धा असंच काहीसं करून. दाखवलं तर आम्हाला भेटशील का? अशी विचारणा तिला चाहते करत आहेत.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा- 

‘दबंग गर्ल’ सई मांजरेकर दिसली मराठमोळ्या अंदाजात; सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

राखी सावंत झाली भावनिक, म्हणाली, फेकलेले अन्न खात आम्ही वाढलो, पहा व्हिडीओ

अभिनेता फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार; ‘या’ मराठी मॉडेलसोबत होणार शुभमंगल