हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमध्ये आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान अरिजीत सिंगच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी अरिजित सिंगच्या मातोश्रींचे कोरोनाचे निदान झाले होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. यानंतर कोलकातामधील रुग्णालयात त्यांना त्वरित भरती करण्यात आले होते. मात्र त्यांची कोरोनाशी झुंझ अपयशी ठरली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
একমো ভেন্টিলেশনে ছিলেন তিনি#arijitsingh #arijitsingmother #Covid19IndiaHelp https://t.co/BKyGvGDR0S
— zee24ghanta (@Zee24Ghanta) May 20, 2021
मिळालेल्या माहितीनुसार अरिजीत सिंगच्या आई गेल्या काही दिवसांपासून ECMO वर होत्या. त्यांची प्रकृती आधीपासूनच चिंताजनक होती. कोलकाता येथील रुग्णालयात त्यांच्यावर संबंधित उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य अतोनात प्रयत्न केले. संबंधित औषधे आणि इतर यंत्रणांचा कास लावूनही त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आधीपेक्षा जास्त ढासळली. यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
https://twitter.com/ARIJIT__SINGH/status/1390241652300685315
अरिजीतच्या आईंना ‘ए निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता आहे अशी पोस्ट अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी ६ मे २०२१ रोजी ट्विटरवर केली लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने अरिजीतच्या आईंसाठी मदत मागितली होती. स्वस्तिकाच्या पोस्टवर कमेंट करुन अनेक चाहत्यांनी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अरिजीतने पोस्ट करीत मदत मिळाल्याची माहिती दिली होती. सोबतच मदत करणाऱ्यांचे व मदतीसाठी पोस्ट शेअर करणाऱ्या प्रत्येकाचे त्याने आभार मनात लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र या सगळ्यानंतरही अरिजीतने आपली आई गमावलीच. आईंच्या निधनामुळे अरिजित अत्यंत दुखी असून तूर्तास त्याने माध्यमांशी कोणताही संपर्क करणे टाळले आहे.