हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood : बिझनेसमन ललित मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडिया धुमाकूळ घालत आहेत. गेले काही दिवस सोशल मीडियावर या दोघांबाबतच सतत चर्चा केली जात आहे. अशातच सुष्मिता सेनला ‘गोल्ड डिगर’ म्हणून नेटिझन्स कडून ट्रोलही केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या दोघांच्याही नेट वर्थ बाबतची माहिती जाणून घेउयात. जेणेकरून दोघांपैकी कोणाकडे सर्वात जास्त पैसे आहेत हे कळू शकेल.
आता ललित मोदीविषयी बोलायचे झाले तर भारतातून फरारी घोषित झाल्यानंतर तो गेली काही वर्षे ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनमध्ये राहतो आहे. 2010 साली तो देश सोडून पळून गेला होता. यावेळी त्याच्यावर मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप झाला आहे. Bollywood
ललित मोदी हा खूप मोठा उद्योगपती आहे. त्यांच्या कुटुंबाचा मोठा व्यवसाय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या तो लंडनमध्ये एका आलिशान घरात राहतो आहे. 7000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या घरात एकूण 8 बेडरूम आहेत. Bollywood
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आलिशान घरासाठी ललित मोदीला दरमहा 20 लाख रुपये मोजावे लागतात. हे लक्षात घ्या कि, भारताव्यतिरिक्त जगभरातील इतर अनेक देशांमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला आहे. त्यामुळे ललित मोदी कोट्यवधींमध्ये कमाई करतो आहे. Bollywood
तसेच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ललित मोदीची एकूण मालमत्ता 12 हजार कोटींच्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे जवळपास 4500 कोटींची मालमत्ता आहे. Bollywood
आता सुष्मिता सेनबाबत बोलायचे झाल्यास तिच्या कमाईचा एकमेव स्त्रोत हा चित्रपटसृष्टी आहे. एका चित्रपटासाठी ती 3 ते 4 कोटी रुपये फी घेते. अशा प्रकारे चित्रपटांमधून तिला वर्षाला सुमारे 9 कोटी रुपये मिळतात. Bollywood तसेच सुष्मिता सेनकडेही जवळपास 100 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. ती मुंबईतील वर्सोवा येथे एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. याशिवाय सुष्मिता सेनकडे दोन BMW आणि एक Audi सारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. Bollywood
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Sushmita_Sen
हे पण वाचा :
Netflix आता फ्री पासवर्ड शेअरिंगवर घालणार बंदी !!!
“पॅकेजिंगशिवाय विकल्या तर ‘या’ 14 खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू होणार नाही” – Nirmala Sitharaman
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 5 घटकांकडे लक्ष द्या
रशियाने Google ला ठोठावला 3,000 कोटींचा दंड !!!
Post Office ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक करून मिळवा 15 लाख रुपये !!!