“पॅकेजिंगशिवाय विकल्या तर ‘या’ 14 खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू होणार नाही” – Nirmala Sitharaman

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी आज एक लिस्ट शेअर केली. यावेळी त्यांनी सांगितले की,” जर लिस्ट मधील 14 वस्तू सुट्ट्या म्हणजेच पॅकिंगशिवाय विकल्या गेल्या तर त्यांच्यावर कोणताही GST लागू होणार नाही. या लिस्टमध्ये डाळी, गहू, बाजरी, तांदूळ, रवा आणि दही/लस्सी यांसारख्या दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman sets the record straight on GST on  pre-packaged food

हे लक्षात घ्या कि, गेल्या महिन्यात चंदीगड येथे झालेल्या GST कौन्सिलच्या 47 व्या बैठकीत केंद्र सरकारकडून तृणधान्ये, तांदूळ, मैदा आणि दही यांसारख्या वस्तूंवर 5 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे समर्थन करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की,” हा जीएसटी फक्त प्री-पॅकेज्ड आणि लेबल्ड केलेल्या वस्तूंवरच लागू आहे.” Nirmala Sitharaman

What Is The GST Tax?

“जीएसटीबाबत अनेक गैरसमज”

अनेक ट्विट्स करत अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी सांगितले की, “अलीकडेच, GST परिषदेने आपल्या 47 व्या बैठकीत डाळी, तृणधान्ये, पीठ यांसारख्या विशिष्ट खाद्यपदार्थांवर GST आकारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची शिफारस केली आहे. मात्र, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. मात्र वस्तुस्थिती समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.”

“एवढ्या खाद्यपदार्थांवर टॅक्स आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे का? नाही, GST च्या आधीच्या काळात राज्य सरकारे अन्नधान्यापासून भरपूर महसूल गोळा करत होत्या. एकट्या पंजाबने अन्नधान्यावर खरेदी टॅक्सच्या स्वरूपात 2,000 कोटी रुपयांहून जास्त रक्कम जमा केली. यूपीने 700 कोटी रुपये उभे केले.” Nirmala Sitharaman

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.gst.gov.in/

हे पण वाचा :

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 5 घटकांकडे लक्ष द्या

रशियाने Google ला ठोठावला 3,000 कोटींचा दंड !!!

Post Office ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक करून मिळवा 15 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा कमाईची संधी !!!

Leave a Comment