व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने खळबळ; BDDS पथक घटनास्थळी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात जिवंत स्फोटके असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बॅगेत जिलेटिन च्या 54 कांड्या सहित बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्या. मात्र वेळीच ही बॅग सापडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

हाती आलेल्या माहितीप्रमाणे, रेल्वे स्टेशन परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्याची माहिती मिळताच डॉग स्कॉड, BDDS चं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या कांड्या सर्किटद्वारे एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत आढळल्या.

 

बीडीडीएस ला प्राथमिक दृष्ट्या ते जिवंत बॉम्ब सारखे वाटल्यामुळे सध्या ती बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ताब्यात घेऊन बीडीडीएस च्या खास गाडीमध्ये  नेण्यात आली आहे. संध्याकाळी सातनंतरच्या सुमारास ही बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या मुख्य दारा जवळील ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे तार ने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर आधी पोलिसांनी त्याची पाहणी केली, ती वस्तू इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या स्वरूपात असल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले.

बॉम्ब शोधक पथकाने ते ताब्यात घेऊन विशेष गाडीने पोलीस मुख्यालयात नेले आहे. दरम्यान डेटोनेटर आणि त्यासोबत सर्किट ने जोडलेल्या त्या कांड्या किती घातक होत्या हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही….