इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारा विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची धमकी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो 6E 5314 (IndiGo Flight) विमानाला मिळाली आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवरच इंडिगोने एक प्रेसनोट जारी केली आहे. यासह मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पोलीस यंत्रणा या सर्व प्रकाराचा तपास करीत आहेत.

दिल्ली अग्निशमन सेवांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सकाळी 5:40 वाजता IGI कडून बॉम्बच्या धमकीचा फोन आला होता. याशिवाय फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर ‘३० मिनिटांत बॉम्बस्फोट’ लिहिलेली ही आढळले होते. हा पेपर पायलटला सापडला होता. या सर्व प्रकारानंतर ताबडतोब पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले. यानंतर हे विमान एका विलगीकरण खाडीत नेण्यात आले. जिथे सर्व प्रवाशांना सुखरूप विमानातून उतरविण्यात आले. पुढे सर्व तपासण्या झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात घेऊन जाण्यात आले.

शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या विस्तारा विमानात (Vistara Flight) बॉम्बची धमकी मिळाली होती. या विमानात 177 लोक आणि एक लहान मूल प्रवास करत होते. ही धमकी मिळताच विमान कंपनी आणि सुरक्षा दलांनी यावर तातडीने कारवाई केली. यानंतर फ्लाइट UK-611 ला दुपारी ठीक 12:10 वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. मात्र या प्रकारामुळे सुरक्षा दलात गोंधळ उडाला होता.