दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्बची धमकी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

vistara flight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यामुळे दिल्ली विमानतळ परिसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले . जीएमआर कॉल सेंटरला हा धमकीचा फोन येताच त्वरित विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. तसेच सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येक एका प्रवाशाची आणि विमानातील सर्व सामानाची तपासणी करण्यात आली. मात्र कोणताही बॉम्ब किंवा धोकादायक वस्तू विमानात सापडली नाही. यानंतर पोलिसांनी तातडीने या सर्व घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी जीएमआर कॉल सेंटरला एक धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीकडून दिल्ली-पुणे विस्तरा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या फोनची माहिती मिळतात पोलिसांनी तातडीने दिल्ली विमानतळ गाठले. यानंतर सर्व विमानांची योग्यरीत्या व्यवस्थित पाहणी करण्यात आली. सर्वात प्रथम विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. सुरक्षा यंत्रणेकडून विमानाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बॉम्ब सापडला नाही. तसेच, कोणतीही धोकादायक गोष्ट प्रवाशांच्या सामानात आढळून आली नाही.

बातमीमुळे खळबळ

जीएमआर कॉल सेंटरला धमकीचा फोन येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. मुख्य म्हणजे या धमकीमुळे प्रवाशांच्या मनात देखील भीती निर्माण झाली तसेच दिल्ली विमानतळावर खळबळ माजली. यानंतर सुरक्षा यंत्रणेकडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आता विमानात कोणतेही संशयास्पद गोष्ट आढळून आल्यामुळे हा एक बनावट कॉल आला असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य म्हणजे, यापूर्वी देखील कॉल सेंटरला अशा प्रकारे धमकीचे कॉल येऊन गेले आहेत. सध्या पोलिसांनी बॉम्बची खोटी माहिती दिल्याबद्दल एफआयआर नोंदवली आहे. तसेच हा कॉल कोणी केला याचा तपास सुरू आहे.