टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूक यांना औरंगाबाद खंडपीठाकडून अटक पूर्व जमीन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूक यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शंतनू मुळूक यांना औरंगाबाद खंडपीठाने अटक पूर्व जमीन मंजूर केला आहे. याशिवाय ट्रान्झीस्ट बेलसाठी न्यायालयाने मुळूक यांना १० दिवसांचा अवधी दिला आहे. बेंगळुरू येथून पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळूक (रा. बीड) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळक यांनी औरंगाबाद खंडपीठात शंतनू मुळक यांनी अ‍ॅड. सतेज जाधव मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झीस्ट अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शंतनू मुळक यांना तात्पुरता दिलासा देत अटक पूर्व जमीन मंजूर केला आहे. तसेच ट्रान्झीस्ट बेलसाठी न्यायालयाने मुळूक यांना १० दिवसांचा अवधी न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दिशावर शेतकर्‍यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आले होते.

Leave a Comment