महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या वाटेवर? आवश्यक तिथं कंटेन्मेंट झोन तयार करा! मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. आवश्यक तिथं कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे या आदेशात म्हटलं आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत अशा सूचना या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकारी वर्गाला केल्या. ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या. त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या. जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा असं स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यानी यावेळी दिलेत. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचेय असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

You might also like