सुशांत सिंह राजपूत प्रकरण: अखेर रिया चक्रवर्तीला मिळाला जामीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर मुंबई उच्च न्यायालायने जामीन मंजूर केला आहे. सुशांत प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाला NCB ने अटक केली होती. महिनाभर पोलीस कोठडीत राहिल्यानंतर रियाची जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र,  यावेळी रियाला पासपोर्ट अमलीपदार्थ विरोधी पथकाककडे (NCB) जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. रियाला पोलिसांच्या परवानगी शिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियासोबत सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालायने NCB ने ड्रग्स प्रकरणातच अटक केलेल्या रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शौविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली ८ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.

 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आलं होतं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केलं होतं. सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment