मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. रविवारी जाहीर झालेल्या या एक्झिट पोलनंतर सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील 11 हजार 648 अंकांवर पोहोचला.
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली. पहिल्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स 802 अंकांनी वाढला असून निफ्टीतही 229 अंकांची वाढ झाली आहे. सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली. शेअर बाजारात 802 अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 38,819.68 अंकांवर उघडला. तर निफ्टीतही 229 अंकांची वाढ होऊन 11,691.30 अंकांवर उघडला.
तज्ज्ञांचे असे मत आहे की, केंद्रात स्थिर सरकार येण्याची चिन्हे दिसता असल्याचे पाहून, शेअर बाजार याचा आनंद साजरा करेल. केंद्रात कोणाचे सरकार येणार याचा फैसला 23 मे रोजी होणार असला तरी एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. या पोलला शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. देशात पु्न्हा एकदा मोदी सरकार येणार यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने ही तेजी आली आहे.