हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून LPG गॅस सिलिंडर बुक करू शकता. होय, हे खरं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस रिफिलिंगसाठी ग्राहकांना Whatsapp आणि SMS ची सुविधा दिली आहे. याअंतर्गत भारत गॅस, इंडेन आणि HP गॅस सारख्या कंपन्यांचे ग्राहक व्हाट्सअँपच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि घरच्या घरी बसून गॅस सिलिंडर ऑर्डर करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
HP गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकांनी कसे बुकिंग करावं ?
यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये HP ग्राहक सेवा क्रमांक 9222201122 सेव करून घ्या. हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जाऊन सेव्ह केलेला नंबर ओपन करा. आता HP गॅस सिलेंडर क्रमांकावर Book असा मेसेज पाठवा. जेव्हा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून Book असा मेसेज पाठवताच तुम्हाला ऑर्डर बाबतीत डिटेल्स मिळतील. सिलिंडरची डिलिव्हरी कधी होईल यासह संपूर्ण माहिती तुम्हाला यावेळी मिळेल.
इंडेन गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकांनी कसे बुकिंग करावं ?
इंडेन गॅसचे ग्राहक 7588888824 या क्रमांकावर बुकिंग करू शकतात. यासाठी सर्वप्रथम हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. त्यानंतर WhatsApp ओपन करा. त्यावरून हा सेव्ह केलेला नंबर उघडा आणि नोंदणीकृत नंबरवरून Book किंवा REFILL असा मेसेज टाईप करून पाठवा. त्यांनतर तुम्हाला तुमच्या ऑर्डर बाबत सूचना मिळेल. तुमच्या सिलेंडर बुकिंगची डिलिव्हरी कोणत्या तारखेला होईल येसुद्धा तुम्हाला या डिटेल्स मध्ये दिसेल. याशिवाय जर तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा स्टेटस म्हणजे स्थिती जाणून घ्यायची असेल तर याच नंबर वर STATUS आणि ऑर्डर क्रमांक लिहून पाठवावा लागेल.
भारत गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकांनी कसे बुकिंग करावं ?
भारत गॅस सिलिंडर असलेले ग्राहक 1800224344 या Whatsapp क्रमांकावर सिलिंडर बुक करू शकतात. HP आणि ईण्डेन गॅस प्रमाणेच इथेही तुम्हाला व्हाट्सअँप वर जाऊन हा नंबर ओपन करायचा आहे. आणि Book असा मेसेज पाठवायचा आहे. त्यांनतर तुम्हाला ऑर्डर डिटेल्स आणि सिलिंडरची डिलिव्हरी कधी होईल याची माहिती मिळेल . याशिवाय https://my.ebharatgas.com/bharatgas/Home/Index या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही घरबसल्या गॅस सिलिंडर बुक करू शकता.