धक्कादायक। 40 वर्षाच्या महिलेवर झाले एकतर्फी प्रेम; नाकारले प्रेम म्हणून घातल्या गोळ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम हि एक साहजिक भावना आहे. प्रेम केले जात नाही तर ते होते. प्रेम केल्यावर प्रेम मिळावे हि भावना साहजिक आहे. पण त्याचा अट्टहासाने कधी कधी फार वेगळेच काहीतरी घडून जाते. अशीच एक धक्कादायक घटना मुजफ्फरनगरमधे घडली आहे. येथे भरदिवसा एका 40 वर्षीय महिलेला गोळ्या घालून निर्दयपणे ठार मारण्यात आले. असं म्हटलं जात आहे की एकतर्फी प्रेम करत असलेल्या पुरुषाचा प्रस्ताव त्या महिलेने नाकारला होता. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संबंधित प्रकरण मन्सूरपूर पोलिस स्टेशन परिसरातील जळौदा गावचे आहे. येथे राहणारी 40 वर्षीय मुनेश देवी दिवसा शेतात काम करण्यासाठी जात होती. त्यानंतर शेजारील राहूल (वय 18 वर्षे) यानी तिला शेतामधल्या रस्त्यावरच प्रपोज केले, परंतु महिलेने नकार दिला. या रागाच्या भरात त्या तरूणाने महिलेला बंदुकीने गोळ्या घातल्या. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी आरोपी युवकास खेड्यातूनच अटक केली. यासह आरोपीविरोधात तहरीरच्या आधारे गंभीर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आरोपीला तुरूंगात पाठविण्याची तयारी करत आहे. “दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण एकांगी प्रकरण असल्याचे दिसते. आरोपीला अटक करून चौकशी केली जात आहे” असे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले.

Leave a Comment