बिंग फुटण्याच्या धाकाने प्रियकराने दिले गरोदर प्रेयसीला गर्भपाताचे औषध, पण झालं काही असं..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा । अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने तिला चुकीचे औषध दिले. या औषधामुळे प्रेयसीची प्रकृती बिघडली व ही बाब तिच्या कुटुंबीयांपुढे आली. यानंतर याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अरोली पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. शुभम कटरे (वय २४) असं या युवकाचे नाव असून लैगिक अत्याचारासंबंधी विविध कलमांतर्गत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम कटरे याची एका १७ वर्षीय मुलीशी ओळख होती. शुभमने आपल्यावर अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे. यातून तिला गर्भधारणा झाली असल्याचे मुलीने सांगितले आहे. जेंव्हा ती ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे शुभमला समजले. तेव्हा आपले बिंग फुटण्याच्या भीतीने त्याने तिचा गर्भपात करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने तिला एक औषध आणून दिले. या औषधांमुळे या अल्पवयीन मुलीची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर हा प्रकार सदर मुलीच्या कुटुंबीयांपुढे उघडकीस आला. हे प्रकरण अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान घडली.

दरम्यान अल्पवयीन मुलीची बिघडलेली प्रकृती लक्षात घेता तिचा गर्भपात करणे अत्यावश्यक झाले होते. अखेर तिच्या संमतीने भंडारा येथील सामान्य रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अरोली पोलिसांनी शुभमवर भादंवि आणि बालकांचे लैंगिक आजारापासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.