BPNL Recruitment 2024 | पशुसंवर्धन विभागात मेगा भरती सुरु, 10 वी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BPNL Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राज्यात मेगाभरतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे यामध्ये तुम्हाला थेट केंद्र शासनाची नोकरी लागण्याची संधी आहे.

ही भरती प्रक्रिया भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL Recruitment 2024) यांच्याकडून राबवली जात आहे. या भरतीबद्दलची अधिसूचना देखील या आधीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता तुम्हाला थेट भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. यामध्ये तब्बल 1125 रिक्त जागा आहेत आणि रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

14 मार्च 2024 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 21 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे . त्यामुळे तुम्ही शेवटच्या दिवसा अगोदरच लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट द्या. हे अर्ज करा शेवटच्या तारखेनंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

त्याचप्रमाणे तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती मिळेल. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे केंद्र विस्तार अधिकारी या पदासाठी उमेदवार हा बारावी पास असणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे आणखी एक केंद्र सहाय्यक हे पद आहे. या पदासाठी उमेदवाराची दहावी असणे गरजेचे आहे. म्हणजेच या भरती प्रक्रियेसाठी दहावीपासून ते पदवीधर पर्यंत जे पास आहेत ते अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया उमेदवारांना लेखी आणि मुलाखत या स्वरूपात द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यांची निवड केली जाईल. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 944 रुपये एवढी आहे. त्यामुळे तुम्ही आता अजिबात वेळ वाया न घालवता लगेच पशुसंवर्धन विभागातील अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आणि त्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा. आम्ही या अर्जाची लिंक खाली देत आहोत त्यावर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज भरू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा