Chandra Grahan 2024: यंदाच्या होळीवर असणार चंद्रग्रहणाचे सावट; असा दिसून येईल परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षीच्या होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असणार आहे. येत्या 25 मार्च 2024 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2024) लागत आहे. याच दिवशी सर्वत्र होळीचा सण ही साजरा केला जाईल. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते. त्यामुळे याला सर्वाधिक धोका जन्माला येणाऱ्या बाळांना असतो.

यावर्षीचे चंद्रग्रहण 25 मार्च रोजी सकाळी 10.24 ते दुपारी 3.01 पर्यंत राहणार आहे. म्हणजेच चंद्रग्रहणाचा काळ एकूण 4 तास 36 मिनिटांचा असेल. या काळामध्ये गर्भवती महिलांनी आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळाची आणि स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यावी, असे हिंदू धर्माच्या पोथी पुराणात म्हटले आहे. या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी जास्त वेळ झोपून राहू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या शिवणकाम करू नये. घराच्या बाहेर देखील पडू नये, असे हिंदू धर्मात सांगितले आहे.

भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही (Chandra Grahan 2024)

25 मार्च रोजी चंद्रग्रहण सकाळी 10:23 ते दुपारी 3:2 पर्यंत असणार आहे. परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधीही वैध राहणार नाही. महत्वाचे म्हणजे, 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आल्यामुळे याचा काही राशींवर शुभ प्रभाव पडेल. मेष, तुळ, कुंभ, या राशींवर चंद्रग्रहणाचा (Chandra Grahan 2024) चांगला प्रभाव पडेल. म्हणजेच या राशीतील व्यक्तींच्या आयुष्यात आनंद येईल, अनेक अडकलेली कामे पूर्ण होतील आणि व्यवसायाला चालना ही मिळेल.