हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brain Health) अनेकदा असे होते की आपल्याला कुणाशी बोलायला, कुणामध्ये मिसळायला नकोस वाटत. एखादं काम कराव वाटत नाही. कुठलीच गोष्ट सकारात्मकतेने करूच वाटत नाही. अशावेळी आपल्या मेंदूवर वाईट परिणाम झाला असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपण लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि यामुळे पुढे जाऊन ही समस्या वाढू शकते. आपल्या मेंदूवर होणारा वाईट परिणाम हा आपल्या वाईट सवयींचा प्रभाव असतो. परंतु, वेळीच या सवयी कोणत्या? हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील काही अशा सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या सवयी आपल्याला गरजेच्या वाटत असल्या तरी त्याच आपल्या मेंदूची वाट लावण्यात सक्रिय आहेत.
1. सकाळचा नाश्ता टाळणे (Brain Health)
रोजची दगदग आणि कामाची गडबड अनेक लोकांना सकाळचा नाश्ता करण्यापासून वंचित ठेवते. मात्र, सकाळचा नाष्टा हा अत्यंत गरजेचा असतो. नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ज्याचा परिणाम थेट आपल्या मेंदूवर होतो. मेंदूच्या पेशींची कार्यक्षमता कमी होते आणि मेंदूला सामान्य क्रिया कलाप करणे देखील कठीण जाते.
2. शरीरातील पाण्याची कमतरता
मानवी शरीराला पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. (Brain Health) मात्र, अनेकदा दिवसभरातील गडबडीत आपण कमी पाणी पितो. आपल्या मेंदूतील ७५ टक्के भाग हा पाण्याचा असतो. यामुळे त्याला हायड्रेड ठेवणे गरजेचे असते. मात्र, कमी पाणी प्यायल्याने मेंदूला आवश्यक असणारे पाणी मिळत नाही. परिणामी मेंदूच्या उती आकुंचन पावतात आणि पेशी सक्रियता गमावतात.
3. अपूर्ण झोप
अपूर्ण झोप ही विविध प्रकारे आपल्या शरीराचं आणि महत्त्वाचं म्हणजे मेंदूचं नुकसान करत असते. कारण, अपुऱ्या झोपेमुळे आपल्या मेंदूला चालना मिळत नाही. परिणामी चिडचिड होते आणि कामात मन लागत नाही. निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. लक्ष केंद्रित करता येत नाही. इतकेच काय तर झोपेच्या कमतरतेमुळे डिमेन्शियाचा धोका वाढतो.
(Brain Health) अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही आणि त्यामुळे इतर सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकदा न्यूनगंड देखील निर्माण होतो आणि परिणामी एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसातील २४ तासांपैकी ७ ते ८ तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.
4. तोंडावर पांघरूण घेऊन झोपणे
अनेक लोकांना थंडी असो किंवा गर्मी तोंडावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय असते. आपण नाकातून ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडत असतो. मात्र, आपण तोंडावर पांघरूण घेतल्याने या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होते. तोंडावर पांघरूण असल्याने चेहऱ्यावरती co2 जमा होतो आणि परिणामी रात्री ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे मेंदूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सवयीमुळे तुमचा मेंदू सक्रियपणे काम करणे थांबवू शकतो.
5. स्ट्रेसमध्ये एकटे राहणे
काही लोक फार एकलकोंडी असतात. त्यांना लोकांमध्ये मिसळणे, लोकांशी गप्पा मारणे अजिबात आवडत नाही. मात्र, सतत एकटं राहणं हे तणावाचं मुख्य लक्षण आहे. (Brain Health) चार चौघात मिसळल्याने आणि मित्र- मैत्रिणींशी बोलल्याने आपल्या मेंदूवरील ताण कमी होतो. परंतु, एकाकीपणामुळे नैराश्य आणि स्मृती भ्रंशसारख्या आजाराचा धोका वाढतो.
6. जास्त खाण्याची सवय
अनेक लोक एकदम फुडी असतात. पण, या लोकांना हेल्दी फूड खाणे काही आवडत नाही. त्यामुळे या लोकांच्या आहारात जंक फूड, तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ आणि शीतपेयांचा समावेश असतो. असे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने मेंदूच्या पेशींचे नुकसान होते. त्यामुळे जर तुमच्याही आहारात असे पदार्थ असतील तर याचे सेवन कमी करा किंवा पूर्णपणे टाळा.
7. लाऊड व्हॉइसमध्ये हेडफोनचा वापर करणे
अनेक लोकांना मोठ्या आवाजात हेडफोनवर गाणी ऐकणे फार आवडते. मात्र, अशा पद्धतीने गाणी ऐकणं तुमच्या श्रवण शक्तीसोबत मेंदूचे देखील नुकसान करत असते. (Brain Health) एका संशोधनानुसार, श्रवण शक्ती कमी झाल्याने मेंदूच्या उतींचे नुकसान होते. यामुळे अल्झायमर होण्याचा धोका वाढतो.
8. डिजिटल स्क्रीनचा अतिवापर करणे
आजच्या आधुनिक जगात जो तो डिजिटल स्क्रीनचा वापरकर्ता आहे. जो तो दिवसभरातील ७ ते ८ तास आरामात डिजिटल स्क्रीनचा वापर करतो. यामुळे डोकेदुखी आणि ब्रेन ट्यूमरसारखे विकार होण्याची शक्यता असते.
9. मद्यपान आणि धूम्रपान करणे
मद्यपान आणि धूम्रपान करणे या दोन्ही सवयी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहेत. शिवाय मेंदूवरदेखील या सवयींचा अत्यंत गंभीर परिणाम होतो. या सवयी मेंदूच्या नसा संकुचित करतात आणि पेशींचे नुकसान करतात. परिणामी मेंदूचा हिप्पोकॅम्पस म्हणजेच जिथे आठवणी साठवल्या जातात त्याचा विकास थांबतो. (Brain Health)