आपण नेहमीच वाचले किंवा ऐकले असेल की, पाणी हेच आपले जीवन आहे. मनुष्याला जगण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही जेवण न जेवता देखील जिवंत राहू शकता. परंतु जर तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी झाले किंवा तुम्ही जर वेळेवर पाणी पिले नाही तर मात्र तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपल्या शरीरात जवळपास 50 टक्के पाणी आहे. म्हणजेच आपले शरीर हे पाण्यानेच बनलेले आहे. आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असतेच. परंतु ब्राझीलमधील एका व्यक्तीने मात्र हे म्हणणे फेटाळले आहे.
ब्राझील मधल्या एका व्यक्तीने असा दावा केलेला आहे की जे ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही. त्या व्यक्तीने गेल्या 50 वर्षापासून पाण्याचा एक थेंबही पिलेला नाही. तो व्यक्ती केवळ कोको कोला पिऊन पन्नास वर्षापासून जिवंत आहे.
ऑडिटी सेंट्रल या न्यूज रिपोर्टनुसार ब्राझी येथे राहणारे हे रॉबर्ट पेड्रिरा हे 70 वर्षाचे आहेत. ते जगातील सर्वात मोठे कोको कोलाचे चाहते आहेत. रॉबर्ट यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षापासून ते कोको कोला पीत आहेत. त्यांनी ५० वर्षात पाण्याचा एक थेंब देखील प्यायला नाही. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी ते फक्त कोको कोला पितात. परंतु या सगळ्याचा त्यांच्यावर दुष्परिणाम देखील झालेला आहे. त्यांना मधुमेह आहे आणि हृदयविकाराचा देखील धोका आहे. तरी देखील ते कोको कोला पितात
रॉबर्ट यांच्या नातवाने दिली माहिती
कोरोना काळामध्ये रॉबर्ट जेव्हा कोविडमध्ये रुग्णालयात दाखल होते. तेव्हा त्यांच्यावर हॉस्पिटल केअर चार्टमध्ये लिहिलेले होते की, त्यांची औषधे पाण्याने नव्हे तर ते कोको कोलाने खातील. त्यांचा हा चार्ट सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. त्यावेळी लोकांना असे वाटले होते की हे खोटे आहे. परंतु त्यांच्या 27 वर्षाच्या नातवाने सांगितले आहे की, आजोबा हे दुसरे काहीही पीत नव्हते.
नुकतेच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांना आजार आहे. तरीही ते कोको कोला पितात. त्यांना वाटते की, कोको कोलापीने एवढे वाईट असते तर आतापर्यंत ते मेले असते. पण ते आता जिवंत आहेत. पन्नास वर्षापासून त्यांनी पाणी पिले नाही आणि पाणी प्यायला त्यांना आवडत नाही. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी आईस्क्रीम जरी खाल्ली तरी ते त्याच्यासोबत कोक पितात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या हृदयात सहा स्टेंट आहेत. त्याचप्रमाणे त्यांना हृदयविकाराचा झटका देखील येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर त्यांना उच्च मधुमेह आहे तरीही ते कोणाचेच ऐकत नाही आणि ते केवळ दिवसभर कोकच पितात.