विशेष प्रतिनिधी । वर्किंग वूमनचे आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालू असते . घर , ऑफिस आणि नाते सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते . असे असताना स्वतःच्या खानपानाची हेळसांड होते . म्हणूनच आज आपण असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत जो झटपट तर बनतोच आणि चवीलाही छान लागतो . चला तर मग पाहुयात झटपट राव डोसा कसा बनवावा …
सर्वप्रथम पाहुयात आपल्याला काय साहित्य लागणार आहे .
साहित्य : बारीक रवा , जाड पोहे , डाळीचे पीठ , मीठ , १ बारीक चिरलेला कांदा , १ बारीक चिरलेला टोमॅटो , सोडा
कृती : हा डोसा बनवण्यासाठी कोणताही पदार्थ भिजत ठेवायचा नाहीये . बारीक रवा १ वाटी आणि अर्धी वाटी डाळीचे पीठ भिजवून घ्या . डोश्याचे बॅटर जसे असते एवढे पातळ ते भिजवायचे आहे . जाड पोहे भिजवून घ्या आणि मिक्सर मधून काढून घ्या . हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्या . त्यात चवीनुसार मीठ , चिमूटभर खायचा सोडा घालुन डोसा घालण्याची तयारी करा .
हे मिश्रण १० मी. भिजत ठेवा . आता लहान आकाराचे डोसे ताव चांगला ग्रां झाला कि घालायला सुरुवात करा . डोसा घालण्यापूर्वी तव्याला तेल लावू नका . डाळीच्या पीठाने डोसा हॉटेल सारखा लालसर भाजून निघेन . काठ सुटायला लागले कि आतल्या बाजूनेच गरम मसाला भुरभुरून टाका , त्यावर कांदा , टोमॅटो मध्यभागी उभी लाईन मध्ये सजवा . आणि डोसा रोल करून तव्यावरून काढून घ्या …