मुंबई प्रतिनिधी | भिंती आणि घरे पडून मुंबई करांचे प्राण जाण्याचे सत्र मुंबईकरांची पाठ सोडत नसल्याचेच चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. कारण काही वेळापूर्वी मुंबईमधील डोंगरी भागात एक चार मजली इमारतीचा मोठा भाग पडल्याने ४० ते ५० लोक या इमारतीच्या मलब्याखाली दबले असल्याची खळबळ जनक घटना मुंबईमध्ये घडली आहे.
Mumbai: Four-storey Kesarbai building has collapsed in Dongri. More than 40 people are feared trapped. pic.twitter.com/dZNdF2xQg0
— ANI (@ANI) July 16, 2019
डोंगरी येथील ज्या भागात हि घटना घडली आहे. त्याभागात चिंचोळ्या गल्ल्या असल्याने बचाव कार्यास आलेल्या लोकांना घटनास्थळी पोचण्यास अडथला निर्माण होतो आहे.अग्नीक्षामक दलाच्या दोन तुकड्या बचाव कार्याला घटनास्थळी दाखल झाल्या असून एनडीआरएफच्या जावांनाना घटना स्थळी येण्यासाठी ग्रीन कोरीडोर बनवण्यात आला आहे. ४० किमीचा प्रवास करून एनडीआरएफची तुकडी घटना स्थळी दाखल होणार असल्याने ग्रीन कोरीडोर उभा करून त्यांना जलदगतीने त्यांना घटना स्थळी दाखल केले जाणार आहे.