हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना एका शेतकऱ्याने अचानकपणे कीटकनाशक औषधी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मुक्ताईनगर तालुक्यातील पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. यावेळी अचानक योगेश पाटील नावाचे शेतकरी अचानकपणे फडणवीस यांच्या समोर आला. त्याच्या हातात कीटकनाशक औषधाचा डबा होता. यावेळी कीटकनाशक औषध घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पण वेळीच पोलीसांनी झडप घालून त्याच्या हातातील किटकनाशकाचा डबा जप्त केला योगेश पाटील यांची केळीची बाग आहे या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पहाणी दौरा हा फक्त फोटोसेशन साठी आहे फडणवीस ने फक्त रस्त्यावरील असलेल्या शेताची पाहणी करत आहेत असा आरोप करत योगेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून ताफ्याची अडवणूक
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले असताना परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला चंद्रकांत पाटील यांचा आठ महिन्याचा कार्यकाळ कार्यकाळ होता. त्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून घेतात पण त्यांनीही काहीच केलं नाही मुक्ताईनगरच्या जिल्हा हॉस्पिटल सही काम काहीच केलं नाही असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.