शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे दूरचे स्वप्न : शरद पवारांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशातील विविध मान्यवरांच्या प्रतिकूल अनुकूल प्रतिक्रिया येत आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांनी अर्थसंकल्पीय भाषणावर टीका केली आहे. सर्वात लांब आणि दूरदृष्टीचा अभाव असणारे भाषण अशी टीका शरद पवारांनी ट्विटरवरून केली आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे खूप दूरचे स्वप्न असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात कृषी गोदामांवर लक्ष केंद्रित केले आहे परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दृष्टी आणि स्पष्टतेचा अभाव आहे. हे अजूनही एक दूरचे स्वप्न आहे,. असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे योग्यप्रकारे लक्ष दिले नाही. हे सर्वात लांब भाषण होते परंतु त्यामध्ये दूरदृष्टी आणि योग्य दिशांचा अभाव होता.

 

Leave a Comment