हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अफगाणिस्तानात एक प्रवासी विमान कोसळले आहे. पूर्व गझनी प्रांतात सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता एरियाना अफगाण एअरलाइन्सचे विमान कोसळले. ज्या ठिकाणी विमान कोसळले आहे ते क्षेत्र तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली आहे. या क्षणी, मृतांची माहिती नाही.
अफगाण वृत्तसंस्था एरियानाच्या माहितीनुसार हेरात विमानतळावरील कंट्रोल टॉवरच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे विमान एरियाना अफगाण एअरलाइन्सचे होते. यात 110 लोक होते आणि ते हेरातहून दिल्लीकडे जात होते.