राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात आज दिवसभरात 286 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ३२०२ कोरोना रुग्ण आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आत्तापर्यंत ३०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधीत रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही आयसीएमआरकडे परवानगी मागितले आहे. पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे असंही टोपे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझॣटिव्ह आढळले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णासाठी तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल.त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत.

राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील ८३ ट्कके मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत. राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा 2 दिवसांवरून 6 दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहेअसं टोपे यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment