धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. सोलापूर शहरांत आज दहा नवीन कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ४२ कोरोना अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट आज प्राप्त झाले. यातील १० जणांचे अहवाल पोझिटिव्ह आले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

यापूर्वी शहरात दोन रुग्णांना कोरोणा ची लागण झाली होती. त्यानंतर सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकुण ४२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आज त्या ४२ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्या ४२ मध्ये दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. उर्वरित ३२ रुग्ण हे निगेटिव आढळून आलेले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. सोलापूरात कोरोनाने एका पुरूषाचा मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात एक महिला कर्मचारी आल्याने  त्याही पॉझिटिव आढळून आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. त्या महिलेच्या संपर्कात इतर नऊ रुग्ण आल्याने त्यांनाही कोरोणाची लागण झाली आहे. बाधित सर्व बाराही रुग्ण एकाच परिसरातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

सोलापूरात कोरोनाचे नवीन १० रुग्ण

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९३२ वर, दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

Leave a Comment