हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील कोणतीही शक्ती देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी रोखू शकत नाही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंह असून ते कोणालाही घाबरत नाही. असं विधान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला भोपाळ येथे दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी हे विधान केलं.
“जगातील कोणतीही शक्ती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी थांबवू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंह आहेत त्यांना कसलीही भीती वाटत नाही. नरेंद्र मोदी हे भगवान राम आहेत तर अमित शहा हे भगवान हनुमान आहेत, असं चौहान म्हणाले.
मागील महिन्यात जयपूरमध्ये, भारतात आलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील गैर-मुस्लिमांसाठी भारतीय नागरिकत्व कायदा घेऊन येणाऱ्या मोदींची चौहान यांनी देवाची तुलना केली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकात नरेंद्र मोंदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यानं महाराष्ट्रबरोबरच केंद्रात मोठा वाद निर्माण झाला होता.
डिसेंबरमध्ये संसदेने संमत केलेला सीएए कायदा १० जानेवारीपासून अस्तित्त्वात आला. या सुधारित कायद्यामुळे विद्यार्थी, महिला आणि विरोधी पक्षांनी देशाच्या विविध भागात विरोध दर्शविला आहे. हा कायदा धर्माच्या आधारवर भेदभाव करणारा, समाजात फूट पाडणारा आणि असंवैधानिक असल्याने सरकारने हा कायदा रद्द करावा अशी मागणी निदर्शकांनी केली आहे.
बिन-भाजपा शासित चार राज्ये – बंगाल, राजस्थान, केरळ आणि पंजाब यांनी त्यांच्या विधानसभांमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात ठराव संमत केले. तर केरळ सरकारने कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा कायदा मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा आग्रह धरला आहे. विरोधी पक्षांनी सीएएबद्दल जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच हा कायदा केवळ नागरिकत्व देण्याविषयी आहे आणि ते काढून घेण्याविषयी नाही असं ते वारंवार सांगत आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला
जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसच्या दहशतीत! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला