Breaking News : नववी, आकरावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच पास करणार ः ठाकरे सरकार मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोविड 19 महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य व पुढील शैक्षणिक धोरणांचा विचार करूनच शासन शैक्षणिक धोरण अमलात आणत आहे. आता असणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून व विदयार्थी हित लक्षात घेता. शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांमधील नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती (पास) देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. त्यासंर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहिर करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये आँनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे. तसेच इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेत. राज्यातील शिक्षकही या परीस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात विविध उपक्रमाव्दारे शिक्षण सुरू ठेवत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तरी या रोगाचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये कमी आहे. परंतु भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरी भागातून अनेक कामगार स्थलांतर करत आहेत. त्याबरोबर त्यांचे कुटुंबिय ग्रामीण भागात आपल्या गावी जात आहेत . यामुळे ग्रामीण भागात पुढील काळात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणूनच वेळेवर परीक्षा व्हावी. असा सूर काही लोक व्यक्त करत आहेत. आय . सी आय. सी., सी बी एस. सी,व आय. बी बोर्ड यांच्या परीक्षा मात्र वेळेवर होत आहेत. त्यामुळेच भविष्यात होणाऱ्या अनेक स्पर्धात्मक परीक्षेत राज्यातील मुले नक्कीच मागे पडणार. अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याची इच्छा असते व पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम या दृष्टीने राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यात संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उध्दभवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा आँफलाईन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.