म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले

1
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री १० वाजून ५० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. त्यांच्यावर कोणत्या प्रकारची उपचार पध्द्ती अवलंनबली यांची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिली आहे.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

सुषमा स्वराज यांच्यावर सर्वप्रथम सीपीआर आणि हार्ड पंप उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला. तरी देखील त्यांच्या शरीराने उपचारासाठी साथ दिली नाही म्हणून त्यांना कृत्रिम ऑक्सिजन अर्थात व्हंटीलेटर जोडण्यात आले. त्यानंतर देखील त्यांचे शरीर उपचारासाठी साथ देण्यास तयार नव्हते. उपचारा दरम्यान डॉक्टरांना समजले की सुषमा स्वराज यांना कार्डियाक अरेस्टचा झटका आला असल्याने शरीर उपचारास साथ देत नाही. तेव्हा डॉक्टर देखील हतबल झाले.

कणखरपणा मधील मायाळूपणा हरपला ; सुषमा स्वराज यांचे दुखःद निधन

उपचार दरम्यान सुषमा स्वराज यांची प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने अखेर १०.५० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. एम्स रुग्णालयातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांचे निधन होताच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले.कारण सुषमा स्वराज या तब्बल ७० मिनिटे मृत्यूशी झुंज देत होत्या मात्र डॉक्टरांच्या उपचाराला यश आले नाही. म्हणून डॉक्टर सुषमा स्वराज यांचे निधन होताच ढसाढसा रडले. दरम्यान सकाळी ११ वाजल्या पासून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन खुले केले गेले आहे. तसेच त्यांच्यावर दुपारी ३ वाजता दिल्लीतच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here