अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पिंपरीमध्ये मी केलेले वक्तव्य हे माध्यमांनी चुकीची लावली त्यामुळे मला नेमके काय म्हणायचे होते हे माध्यमांमध्ये व्यवस्थित गेले नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की बारामती विधानसभा आमचे लक्ष नाही. तर २०२४ची बारामती लोकसभा हि निवडणूक जिंकणे आमचे धोरण आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

अजित पवार यांचा पराभव करणे हे केवळ विधानच होऊ शकेल. मात्र त्यांचा पराभव करणे हे आमचे उद्दिष्ट नाही. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. मात्र त्यांचा त्या निवडणुकीत पराभव होऊ शकला नाही. उलट त्यांचे मताधिक्य गेल्या वेळी पेक्षा यावेळी वाढले. त्यामुळे भाजप चांगलेच चौताळले आहे. म्हणून २०२४ला कोणत्याही परिस्थितीत सुप्रिया सुळे यांना पराभूत करायचेच असा चंगच विरोधकांनी बांधला आहे.

तेव्हा बातमी व्यवस्थित छापली नव्हती. आता बातमी व्यवस्थित छापा आणि अजित पवारांना हि खुशखबर द्या कि आम्ही तुमचा पराभव करणार नाही म्हणुन असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.