नवी मुंबई प्रतिनिधी | नेत्याने कार्यकर्त्यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात घेऊन गेल्याच्या घटना अनेक घडल्या असतील मात्र नव्या मुंबईत एक अजबच प्रकार बघायला मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नव्या मुंबईतील राष्ट्रवादीचे कर्तेधर्ते गणेश नाईक बुधवारी सकाळी ११. ३० वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांनी आणि महापौरांनी गणेश नाईक यांना अखेर गरळ घातली आहे आणि सर्वांचे भाजपमध्ये जाण्याचे निश्चित झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नव्या मुंबईतील ५७ नगरसेवकांनीं आज महापौरांच्या निवासस्थानी बैठक घेऊन राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर हा निर्णय गणेश नाईक यांना सांगून त्यांनी भाजपमध्ये डेरेदाखल होण्यास त्यांना विनंती केली. ती वीनंती गणेश नाईक यांनी ऐकली आणि त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या चिंतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे असे दिसते आहे.
दरम्यान राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी एकमेव महानगरपालिका आज त्यांच्या हातातून निसटली आहे. त्याचे दुःख आणि चिंता शब्दात वर्णित करता नयेणारी आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबद्दल असलेला पक्षातील अविश्वासच या फुटीला कारणीभूत आहे असे देखील बोलले जाते आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आत्मपरीक्षण करण्याचे सोडून भाजपवर टीका करत असल्याचे देखील बघायला मिळते आहे