पाककला|ब्रेड पेटीस बनवण्याची कृती आज आपण पाहणार आहोत.
साहित्य –
- चार ब्रेडचे स्लाईस
- दोन मोठे चमचे सॉस
- एक चमचा शेंगदाण्याची चटणी
- लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी
- तीन मोठे चमचे बेसन
- तळण्यासाठी तेल
- एक चमचा ओवा
- दोन चीज
- चवीपुरतं मीठ .
कृती –
- ब्रेडच्या कडा काढून घ्याव्या . त्याच्या एका बाजूला तेलाचा अथवा बटरचा हात लावावा .
- त्यावर चटणी किंवा सॉस पसरून त्यावर चीज किसून घालावं .
- नंतर दुसरा स्लाईस बटर लावून , सॉस लावून त्यावर सॅन्डविच करतो त्याप्रमाणे ठेवावा . नंतर त्याचे बरोबर त्रिकोणी दोन तुकडे करून घ्यावे .
- आता बेसनाचं भज्यांसाठी करतो इतपत पीठ भिजवून त्यात हळद , ओवा व चवीपुरतं मीठ घालावं .
- आधी केलेले त्रिकोणी सॅन्डविच त्या पिठात बुडवून तेलामध्ये तळून घ्यावे .